सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ऑर्किडची आरुषी उस्तुरगे सोलापुरात अव्वल; गुणवंतांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सीबीएसई माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून सोलापूर शहरातील सीबीएसई पॅटर्न मध्ये नावलौकिक प्राप्त नागेश करजगी ऑर्किड स्कुलने विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा स्कुलमध्ये आयोजित करण्यात आला होता. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती मा. सौ. रंजिता चाकोते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, विश्वस्त सोमनाथ करजगी, योगिनाथ करजगी, मोहिनी करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्कूलची विद्यार्थिनी आरुषी उस्तुरगे हिने ९९.६०% गुण मिळवून सोलापुरात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे तसेच यशराज भोसले याने सुद्धा ९९% गुण मिळवून सोलापुरात द्वितीय स्थान मिळविले. विद्यार्थ्यांच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक होत आहे. आरुषीने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. सोलापुरात प्रथम व द्वितीय स्थान मिळवून या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असून शाळा व पालकांचे नाव उंचावले आहे. एकूण १२७ विद्यार्थ्यांनी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होवून शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
मराठी विषयात एकूण २५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. यात आरुषी उस्तुरगे, दिव्या चव्हाण, आदिती शिंदे, अदिती पाटील, अनन्या सोनकांबळे, अनमोल वडजे, अनुश्री कराळे, मानसी मोरे, ओंकार मेहता,वरद बिनगे, विराज कलुबरमे,यशराज भोसले, आदित्य चौगुले, अनिशा बंडगुल, कृतिका बिज्जरगी, आर्या चंडक, मल्लिकार्जुन चिखलांडे, धनश्री गोविंदे, प्रथमेश गुंड,इरफान पठाण, पलक छाजेड, पूर्वा कोचर, सृष्टी घुले, श्रुतिका मोटे, वेदांती गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयात आरुषी उस्तुरगे, यशराज भोसले, पलक छाजेड, ओंकार मेहता, वरद बिनगे, मानसी मोरे, अनिशा बंडगुल, विराज कलुबरमे, आदिती शिंदे, अनन्या सोनकांबळे, इंग्रजी या विषयात पलक छाजेड, पूर्वा कोचर, वरद बिनगे, व सायन्स या विषयात आरुषी उस्तुरगे या विद्यार्थ्यांनी १००/१०० गुण मिळविले आहेत.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्राचार्या रुपाली हजारे, शिक्षकवृंद तुलसाश्री चितारी, हीना पटेल, स्वाती कोकाटे, श्रीकांत जोशी, राजेश्वरी शिरकणहळळी, इमरान सय्यद, लता भोसले, अमित वाले भाग्यश्री नंदी, ममता बालिंगल, आदिनाथ सरवदे, राजश्री महाले, आनंद लिगाडे, चंदन माने, कविता श्रीगादी, सारिका मुळे तसेच पालकांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी मा. रंजिता चाकोते यांनी विद्यार्थ्यांनी त्याच्या शैक्षणिक जीवनातील पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. पुढील यशस्वी जीवनासाठी आपली आवड व कल ओळखून योग्य क्षेत्राची निवड करावी असे मार्गदर्शन केले.
राजेश छाजेड व रेवणसिद्ध उस्तुरगे या पालकांनी त्यांच्या पाल्याच्या जडणघडणीत व यशात शाळेतील सर्व स्टाफ व संस्थेचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून शाळेतील स्टाफ व संस्थेचे सदैव ऋणी राहू असे मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्या रुपाली हजारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तुलसाश्री चितारी यांनी केले.

No comments:
Post a Comment