शरदबापू मोरे यांनी संघर्षातून व्यवसायाबरोबर सामाजिक, राजकीय काम उभे केले- पालकमंत्री गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

शरदबापू मोरे यांनी संघर्षातून व्यवसायाबरोबर सामाजिक, राजकीय काम उभे केले- पालकमंत्री गोरे

 शरदबापू मोरे यांनी संघर्षातून व्यवसायाबरोबर सामाजिक, राजकीय काम उभे केले- पालकमंत्री गोरे




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शरद बापू मोरे यांनी प्रचंड अडचणीतून मात काढत व्यवसायाचे साम्राज्य उभा केले ५० लिटर पासून सुरू झालेला दूध संघ आता लाखो लिटर मध्ये दुधाचे संकलन करतोय व्यवसायात जो अडचणीतून मार्ग काढतो संकटाच्या वाटेला येतात तोच पुढे जातो ज्यांनी संकटाची वाईट काळाची अनुभूती घेतली तो माणूस काळजीपूर्वक आपली पावले टाकत असतो शरद बापू मोरे यांनी संघर्षातून व्यवसायाबरोबर सामाजिक राजकीय काम उभे केले असल्याचे मत
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व्यक्त केले.
        ते नातेपुते येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट तसेच एसपीजी मल्टिस्टेटचे घेण्यात आलेल्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे,यांच्या हस्ते शिवप्रसाद फार्मा व एसपीजी मल्टिस्टेटचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मा.आ. रामहरी रुपनवर, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते,  सोलापूर जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, प्रशांत पाटील, उत्तम फरतडे, आप्पासाहेब देशमुख, राजकुमार पाटील, अतुल जाधव, दहिवडी नगराध्यक्षा मिलम जाधव, नगरसेवक बी. वाय. राऊत, सुजय भैया माने - पाटील, प्रकाश पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरदबापू मोरे, ऋतुजा मोरेशशीकांत कल्याणी, महादेव कावळे, आर.पी.आयचे नेते एन.के. साळवे,राजकुमार हिवरकर, , शिवराज पुकळे, अनिल इंगवले, बंडोपंत लवटे, चंद्रकांत जाधव, मोरे डॉक्टर, देविदास पाटील, रणधीर पाटील, रणवीर देशमुख, अतुल जाधव, निलेशजी ननावरे, बाजीराव काटकर, संजय पाटील , निनाद पाटील, मोहन सावंत, भारत सूळ, वीरेंद्र पांढरे, भाऊबली चंकेश्वरा, वालचंद काळे, रणजीत सूळ, प्रकाश वलेकर, नरेंद्र कवितके, संतोष काळे, राहुल निकम, सचिन पवार, बाळासाहेब चिकणे, चांगन सर, संजय कदम, संजय किर्दक, सोमनाथ, संजय उराडे, माऊली उराडे, भगत महाराज,  जाधव, राजेंद्र पांढरे, सतीश शिंदे, जगन्नाथ मगर, संजय पवार, हितेश सावंत, अय्याज मुलाणी, सुधीर मोरे, सतीश मोरे, योगेश चिकणे, अभिजीत चिकणे, बाळासो खिलारे, धनाजी खुसपे, अमर रनवरे आदी मान्यवर व मोरे परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

चौकटीत :

शिवप्रसाद उद्योग समूहाची यशस्वी वाटचाल सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत, शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा शिवप्रसाद फार्माच्या माध्यमातून देण्यात येणार असून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी शेतकरी सक्षमीकरणासाठी एसपीजी मल्टिस्टेट या संस्थेची उभारणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages