प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तसेच स्पर्धा संयोजन समिती प्रमुख सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही हे शिबिर उत्साहात पार पडणार आहे. दि. २३ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबीर, तर दि. २३ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत कला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, शंकरनगर येथे दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. क्रीडा शिबिरामध्ये वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी व योगासने या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून कला शिबिरामध्ये कागदकाम व रांगोळी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत क्रीडा व कला प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
ही प्रशिक्षण शिबिरे पूर्णतः विनामूल्य असल्याने परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी खालील संपर्क क्रमांकांवर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा शिबिरासाठी संपर्क : भीमाशंकर पाटील (मो. 9860331717), संजय राऊत (मो. 9890434210), अनिल मोहिते (मो. 7387908110)
कला शिबिरासाठी संपर्क : सिद्धनाथ टिंगरे (मो. 7517484343), तानाजी काशीद (मो. 8806500009), विशाल लिके (मो. 9823196346)
तसेच सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, रत्नाई संकुल अकलूज व महर्षी प्रशाला, यशवंतनगर येथेही नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages