प्रभाग ०८ मध्ये आयुक्तांचा धडक दौरा; प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

प्रभाग ०८ मध्ये आयुक्तांचा धडक दौरा; प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश

 प्रभाग ०८ मध्ये आयुक्तांचा धडक दौरा; प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्र. ०८ मधील विविध नागरी समस्या व प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष भेट देत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसेवेच्या सूचनांचे पालन करण्याच्या उद्देशाने, नगरसेवक प्रविण गिरिजा काशिनाथ दर्गोपाटील यांच्या विनंतीने मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रभाग दौरा केले. यावेळी अनंतकुमार धुम्मा, श्रीरंग गवई, किसन गर्जे, गुरुनाथ निंबाळे आदी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्याची सुरुवात श्री मारुतीरायाची आरती करून करण्यात आली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई मंडई परिसराची पाहणी करत नागरिक व व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. स्वच्छतागृह, वाहनतळ आणि अनधिकृतरीत्या रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत सुधारणा करण्याचे निर्देश देत, आवश्यक असल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

यानंतर पूर्व विभागातील विणकर उद्यान येथे भेट देऊन उद्यानाचे हरित पद्धतीने विकास करण्यासाठी हिरवळ, फुलबाग, सिंचन व्यवस्था, पाण्याचे कारंजे व सुरक्षित भिंत उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आकांक्षी वातानुकूलित स्वच्छतागृह एक आठवड्यात सुरू करण्यास सांगण्यात आले असून, उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहापर्यंत स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जमखंडी पूल परिसरातील इच्छाप्राप्ती श्री गणेश मंदिराजवळील नाल्यावर नवीन पूल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जमखंडी पूल ते गणेश पेठ व्यापारी संकुलपर्यंत नाल्याची सफाई करून दुतर्फा संरक्षण भिंत उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रभागातील भूमिगत विद्युत लाईनवरील नादुरुस्त कव्हरची पाहणी करून ती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दरम्यान, आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल प्रभाग ०८ वतीने नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.

या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, अनंतकुमार धुम्मा, श्रीरंग गवई, विभागीय अधिकारी सावंत, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे, श्रीविद्या गुत्ती, मुख्य आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे, जयकुमार कांबळे, आरोग्य निरीक्षक हमीद हिरोळी, सोमनाथ सिद्धगणेश, पांडुरंग कंदी, शेषेराव शिरसाट आदींसह मनपा अधिकारी, कर्मचारी व प्रभाव ०८ मधील नागरिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages