महिला सुरक्षेसाठी सोलापुरात पथनाट्य; ‘भरोसा सेल’चा प्रभावी जनजागृती उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

महिला सुरक्षेसाठी सोलापुरात पथनाट्य; ‘भरोसा सेल’चा प्रभावी जनजागृती उपक्रम

 महिला सुरक्षेसाठी सोलापुरात पथनाट्य; ‘भरोसा सेल’चा प्रभावी जनजागृती उपक्रम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोलिस आयुक्तालय सोलापूर शहराच्या ‘भरोसा सेल’च्या वतीने महिला सुरक्षा जनजागृती अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. विडी घरकुल, तरटी नाका, सिद्धेश्वर मंदिर परिसर, सात रस्ता आणि चार पुतळा या प्रमुख भागांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
या पथनाट्यातून महिलांना घरगुती हिंसाचाराला बळी न पडता कायदेशीर व समुपदेशनाच्या माध्यमातून मदत कशी मिळू शकते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून कुटुंबातील वाद संवादातून सोडवून संसार कसा सुरळीत ठेवता येतो, याचीही प्रभावी मांडणी करण्यात आली.
हा उपक्रम पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महिला सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा म्हेतर, भरोसा सेल टीम तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, केगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य सादर करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages