नागरिकांनी क्यूआर कोड द्वारे घरी बसून ई केवायसी करावे- जिल्हाधिकारी कार्तिकेयन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएल या तीन गॅस कंपनीच्या एकूण २० गॅस एजन्सी कार्यरत असून गॅस एजन्सी समोर नागरिक ई केवायसी साठी तसेच गॅस सिलेंडर बुकिंगची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. तरी नागरिकांनी घरी बसून क्यूआर कोडच्या माध्यमातून ई केवायसी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की जिल्ह्यात एलपीजी चा पुरेसा साठा उपलब्ध आहे नागरिकांनी ऑनलाइन बुकिंग करावे, त्यांना विहित केलेल्या कालावधीत घरपोच गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्याप्रमाणेच नागरिकांनी ई केवायसी करण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड चा वापर करावा. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. व गरज नसताना बुकिंग करू नये. सोलापूर जिल्ह्यासाठी पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा मागणीप्रमाणे साठा उपलब्ध होत आहे, असे त्यांनी सांगितले.
गॅस एजन्सीमध्ये ई केवायसी करण्यासाठी तसेच बुकिंग ची माहिती विचारण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारले असून यासाठी पुरवठा विभागाचे तीन कर्मचारी तसेच एचपीसीएल बीपीसीएल व आयओसीएल या कंपनीचा एक एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे गॅस सिलेंडरच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारी विषयी त्यांचे निवारण करून समाधान करत आहेत असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील LPG ग्राहकांचे ekyc करणे प्रक्रिया व घरपोच सिलेंडर पुरवठा करण्याबाबत सूचना
*आपण सोलापूर शहरातील अधिकृत एलपीजी ग्राहक आहात
*कृपया आपले गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी ekyc करण्याबाबत आपण संबंधित gas एजन्सी मध्ये न जाता मोबाईल द्वारे ekyc ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठीचा क्यूआर कोड प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
*सर्वप्रथम आपण खालीलप्रमाणे ऍप play स्टोर मधून डाउनलोड करावे
१.IOCL कंपनीचे जी ग्राहक असल्यास Indane Oil ONE हे ऍप डाउनलोड करावे
२.BPCL कंपनीचे ग्राहक असल्यास BPCL For Business हे ऍप download करावे
३.HPCL कंपनीचे ग्राहक असल्यास HP PAY हे ऍप download करावे.
वरील ऍप मध्ये माहिती भरून
Adhaar Face RD या appvarun प्रमाणित करून आपले ekyc त्वरित पूर्ण करून घ्यावे.
तसेच आपली गॅस बुकिंग झाली असल्यास आपल्याला विहित वेळेत घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा होणार असल्यामुळे कृपया गॅस एजन्सी समोर रांगेत उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे.
.png)

No comments:
Post a Comment