मोहोळ तालुक्यात अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे मोठे नुकसान
पंचनाम्यासाठी १५ एप्रिलला आंदोलनाचा इशारा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी आलेल्या भयानक चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पिके, फळबागा तसेच कोणीही येथे बेदाणा शेडचे व बेदाणा याचे नुकसान तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अन्यथा १५ एप्रिल रोजी मोहोळ तहसील कार्यालयासमोर “बोंबाबोंब” आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्यन जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
पेनुर, कोन्हेरी, येवती, खंडाळी, पापरी, देवडी, हिवरे यांसह अनेक गावांमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचेk निवेदन प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसीलदारांना देण्यात आले असून, त्याच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषी मंत्री आणि महसूल मंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
देशमुख यांनी सांगितले की, या आपत्तीमुळे सुमारे ३ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, आमदार राजाभाऊ खरे, खासदार ज्योतीताई वाघमारे तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, शासनाकडून अद्याप आदेश न आल्यामुळे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.
तसेच, २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये पूर आणि चक्रीवादळामुळे सोहाळे, वडवळ व इतर गावांतील झालेल्या नुकसानीची भरपाईही अद्याप मिळालेली नाही. ती तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
पिकांसाठी हेक्टरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई.
फळबागांसाठी १ लाख रुपये.
घरांची पडझड झालेल्यांना १ लाख रुपये.
पूरग्रस्तांना १० वर्षांच्या परतफेडीवर २ लाखांचे बिनव्याजी कर्ज.
माती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत.
यावेळी नाना मोरे, गणेश चवरे, पिंटू पवार, देवडी सुभाष थोरात विनायक भोसले मंगेश अभिवंत कोन्हेरी दत्तात्रेय मुळे गोवर्धन शेळके दीपक जरग नाना कौलगे पेनुर संजय दत्त विष्णू भोसले शिवाजी जाधव,समाधान चवरे मानाजी चवरे, हरिभाऊ लोंढे, तानाजी मुळे, हनुमंत भोसले यांसह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment