न्यासाकडून स्वामी भक्तांकरिता उत्तम व्यवस्थापन- जिल्हाधिकारी कार्तिकेयन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2026

न्यासाकडून स्वामी भक्तांकरिता उत्तम व्यवस्थापन- जिल्हाधिकारी कार्तिकेयन

 न्यासाकडून स्वामी भक्तांकरिता उत्तम व्यवस्थापन- जिल्हाधिकारी कार्तिकेयन


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांकरिता उत्तम व्यवस्थापन होत असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे  यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ व जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव, सुबक प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते  बोलत होते. यावेळी नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी न्यासाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी व कार्य व व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार विनायक मगर, न्यासाचे विश्वस्त भाऊ कापसे, गटविकास अधिकारी शंकरराव कवीतके, अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भीतावडे, अक्कलकोचे मंडल अधिकारी जुबेर नदाफ, तलाठी एस. डोईफोडे, हे उपस्थित होते.

या प्रसंगी न्यासाचे गोटू माने, एस.के.स्वामी,बालाजी कटारे, स्वामींनाथ बाबर,  सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील,गोविंदराव शिंदे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages