पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2026

पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार

 पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार




१ मेपासून स्टार एअरची विमानसेवा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्याहून सोलापूरला आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांतच पोहोचणे शक्य होणार आहे. पुणे विमानतळावर सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्लॉट मंजूर झाले असून १ मेपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे.

पुण्याहून पहिल्यांदाच सोलापूरशी हवाई कनेक्टिव्हिटी होत असून या निमित्ताने पुण्याशी जोडलेले सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे.

पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम सुरू झाला असून १ मेपासून पुणे विमानतळाला मंजूर झालेले १५ स्लॉटचा वापर सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ होत आहे. १५ अतिरिक्त स्लॉटमुळे आता दररोजच्या एकूण स्लॉटची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. नवीन स्लॉटमध्ये पुण्याहून सोलापूर, मंगळूरू व बागडोगरा या शहरांसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा सुरू होत आहे.

'कनेक्टिंग फ्लाइट'चा फायदा सोलापूरकरांना

सोलापूरहून विमान पुण्यात दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी दाखल होईल. थोड्या वेळाच्या अंतराने पुण्याहून दिल्ली, लखनौ, देहरादून, बंगळूरू, कोलकाता, चेन्नई, दुबईसाठी उड्डाणे होतात. त्यामुळे याचा फायदा सोलापूरकरांना देखील होणार आहे. ते 'कनेक्टिंग फ्लाइट'द्वारे अन्य शहरांसाठी पुण्याहून सहजपणे प्रवास करू शकतील.

ही आहे वेळ :

पुणे - सोलापूर - पुणे अशी आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा असणार आहे. शनिवारी मात्र वेळेत बदल असणार आहे.

सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोलापूरहून दुपारी अडीचच्या सुमारास उड्डाण होईल. पुण्यात दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी आगमन होईल.

पुण्याहून दुपारी ४ वाजता सोलापूरला उड्डाण होईल. ४ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास सोलापुरात आगमन होईल.

पुणे - सोलापूर - पुणे फ्लाइट क्रमांक (एस ५-३३१/३३२) असा असणार आहे.

शनिवारी सोलापूरहून ४ वाजून २० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल, तर पुण्याहून सोलापूरसाठी ४ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण होईल.
(सूचना : सोलापूरहून विमानाचे उड्डाण व सोलापुरात दाखल होण्याची वेळ अंदाजित आहे.)

१५ स्लॉटचा या शहरांचा समावेश

सोलापूर, मंगळूरू, बागडोगरा, वाराणसी, चेन्नई, बंगळूरू व पटना या शहरांसाठी पुण्याहून १ मेपासून उड्डाण होणार आहे. यातील सोलापूर, मंगळूरू व बागडोगरा या शहरांशी पहिल्यांदाच विमानसेवेने पुणे जोडले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages