प्रसाद नगर येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

प्रसाद नगर येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्साहात

 प्रसाद नगर येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्साहात



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूर येथील प्रसाद नगर येथे श्री गणेश व वीर हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली .
प्रथम जुळे सोलापुरातील वैभव लक्ष्मी मंदिरापासून श्री गणेश मूर्ती व वीर हनुमान मुर्ती,नंदी मुर्ती, महादेव लिंग मुर्ती,कासव मुर्ती, चार वानर मुर्ती यासह शेकडो सुवासिनींच्या जलकुंभ व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तदनंतर ब्राह्मी मुहूर्तावर होमहवन व सर्व मुर्त्यांचे प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम माळकवठ्याचे श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी, हुबळीचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते करण्यात आली.यावेळी मंद्रुपचे करबसय्या स्वामी पौरोहित्य केले.महास्वामीजींच्या धर्म सभेनंतर सर्व सदभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील सदभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष शंकर कांबळे, उपाध्यक्ष वालजी गामी, सचिव यशवंत पाथरुट, खजिनदार बाजीराव वाघमारे, संचालक  ईरय्या मठपत्ती, राजशेखर स्वामी, मल्लप्पा कोरे निलप्पा स्वामी, कोळी , अप्पू स्वामी, शिवा कोकरे, अविनाश सुणगार, अभिषेक  बिराजदार, सागर मठपती ,आकाश हिरेमठ, चेतन निंबर्गी, शशिकांत स्वामी, कुमार मठपती, श्रीवल्लभ वाघमारे, श्रीरुद्र वाघमारे,विरेश कोळी, सचिन कोळी, अमोल राऊत, विजयकुमार जवळे, अभिषेक गामी, मनोज जैस्वाल, राजशेखर पाटील, लक्ष्मी कांबळे, छाया हिरेमठ, जगदेवी स्वामी व जय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.
*यांनी केले सढळ हाताने मदत -दानशूर व्यक्ती* 
बल्लाळेश्वरचा पाली गणपती व  मंदीर बांधकाम खर्च विक्रांत जाधव यांनी दिले. कनकी आप्पा यांनी हनुमान मूर्ती, नंदी ,महादेव पिंड मूर्ती दान केले. विजयकुमार जवळे यांनी मंदिराचे पितळी कळस दिले. वालजीभाई गामी यांनी मंदीरासाठी लागणारे संपूर्ण ६०० पोती सिमेंट दिले .अनिल गड्डम यानी मंदीराचे स्टील दरवाजा तयार करून दिले. मनोज जैस्वाल यांनी मंदीराचे  पुर्ण फरशीकरण केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages