पंढरपूर शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ,अरुणभाऊ कोळी यांचा शिवसेनेत प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

पंढरपूर शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ,अरुणभाऊ कोळी यांचा शिवसेनेत प्रवेश

 पंढरपूर शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ,अरुणभाऊ कोळी यांचा शिवसेनेत प्रवेश 





१९८६ साली पंढरपूर तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहचविण्यासाठी पहिली शाखा काढलेले व पहिले तालुका प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडलेले अरुणभाऊ कोळी यांनी आता पुन्हा राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा पंचा धारण करीत शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष व मोहोळ नगर पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर,कोळी समाजाचे व शिवसेना शिंदे गटाचे नेते देवानंद दादा भोईर आदी उपस्थित होते.
   अरुणभाऊ कोळी हे कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच संस्थापक जयभवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आल्याचे दिसून आले आहे.तर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आक्रमक आंदोलने,मोर्चे आणि उपोषणे करताना दिसून आले आहेत.सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क असून महादेव कोळी समाजाच्या संघटनात देखील त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
   अरुणभाऊ कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आमचा जुना कट्टर शिवसेनिक पुन्हा आमच्याकडे परत आला याचा मोठा आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.तर शिवसेनेच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करू व पक्षप्रमुख व राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेले अनेक निर्णय,योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेऊ अशी ग्वाही अरुणभाऊ कोळी यांनी दिली.     
  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages