सम्यक विचार मंचतर्फे 11 एप्रिलपासून मिलिंद व्याख्यानमाला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 9, 2026

सम्यक विचार मंचतर्फे 11 एप्रिलपासून मिलिंद व्याख्यानमाला

 सम्यक विचार मंचतर्फे 11 एप्रिलपासून मिलिंद व्याख्यानमाला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील सम्यक विचार मंचतर्फे दि. 11 ते 14 एप्रिल या कालावधीत रोज 6.30 वाजता मिलिंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष विजयानंद भालशंकर व कार्याध्यक्ष सुधीर चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          व्याख्यानमालेचे यंदा 26 वे वर्ष आहे. यंदा दि.11 ते 14 एप्रिल या कालावधीत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंती दिनी शनिवार दि.11 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता मोहोळचे राजू खरे यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमालेत 'उद्योजक राष्ट्रपिता महात्मा फुले' या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प जेष्ठ विचारवंत विक्रम सोनवणे (पुणे) हे गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणकुमार इंगळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून  महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे हे उपस्थित राहणार आहेत.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवार दि.12 एप्रिल रोजी प्रा. पंकज भारतीय (अमरावती) हे 'भारतीय संविधान आणि राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर गुंफणार असून अध्यक्षस्थानी जेष्ठ शल्य विशारद डॉ. औदुंबर मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.
          व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवार दि.13 एप्रिल रोजी चंद्रप्रकाश शिंदे (बीड) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक क्रांतीचे सिध्दांत या विषयावर गुंफणार असून अध्यक्षस्थानी जेष्ठ विधिज्ञ ॲड. संजीव सदाफुले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी भन्ते सुगत शांतेय (पुणे) यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती या धम्मदेसनेने होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्य अभियंता प्रभाकर भालेराव व महापौर विनायक कोंड्याल हे उपस्थित राहणार आहे.
तरी सोलापूर शहरातील तमाम आंबेडकर प्रेमी जनतेने व पुरोगामी विचारसरणीच्या बंधु भगिनीनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सम्यक विचार मंचतर्फे करण्यात आले आहे.
            पत्रकार परिषदेला रविकांत ढावरे, शांतीकुमार कांबळे, अनिल जगझाप, रमेश सुरवसे, चंद्रकांत कोळेकर आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages