अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 9, 2026

अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल

 अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल


माढा (कटूसत्य वृत्त):- अंजनगाव येथे पुतळा प्रकरणी आंदोलन सुरू असताना पुतळ्याच्या जागेची मोजणी करायला आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत 'मोजणी करू नका, नाहीतर एक ऐकला बघून घेतो' अशा पद्धतीने धमकावल्यावरून ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

माढा तालुक्यातील अंजनगाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात खेलोबा मंदिर जागेच्या मोजणीदरम्यान हाके आणि समर्थकांनी धक्काबुक्की व गोंधळ घातला होता. याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर धनगर आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी ही घटना घडली होती. तब्बल तीन दिवस याठिकाणी धनगर आंदोलक ठाण मांडून बसले होते. अखेर चौथ्या दिवशी स्थानिक नेते आणि पोलिसांच्या पुढाकाराने या वादावर तोडगा काढण्यात यश आले होते. त्यानुसार खेलोबा मंदिराच्या जागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात दुसरी एखादी जागा शोधून तिकडे स्थलांतरित करण्यात निर्णय घेण्यात आला होता. या पुतळ्याचे स्थलांतर केल्यानंतर त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून तात्काळ 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages