मिटकलवाडीतील अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश,कृषी अधिकारी पदासाठी निवड. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

मिटकलवाडीतील अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश,कृषी अधिकारी पदासाठी निवड.

 मिटकलवाडीतील अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश,कृषी अधिकारी पदासाठी निवड.




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मिटकलवाडी तालुका माढा येथील अमर शिवाजी सुरवसे यांनी Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत घेण्यात आलेल्या बँकिंग परीक्षेत देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कृषी अधिकारी या पदासाठी झालेल्या परीक्षेत त्यांनी 50.60 गुण मिळवत संपूर्ण भारतातून पहिल्या पाच उमेदवारांमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे EWS प्रवर्गातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याचे गुण 50.70 इतके असून अमर सुरवसे यांनी अत्यंत कमी फरकाने अव्वल स्थान गाठले आहे.
त्यांची निवड कर्नाटका ग्रामीण बँक मध्ये कृषी अधिकारी पदासाठी झाली आहे. या पदासाठी संपूर्ण भारतातून केवळ 50 जागा उपलब्ध होत्या. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर अमर यांनी हे यश मिळवले आहे.
अमर सुरवसे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचखिळा वस्ती (इयत्ता 1 ली ते 4 थी) तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिटकलवाडी (इयत्ता 5 वी ते 8 वी) येथे झाले. दहावीचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय, टेंभूर्णी येथे पूर्ण केले. अकरावी व बारावी शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे झाले. त्यानंतर त्यांनी वडाळा येथील लोकमंगल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली.
ग्रामीण भागातील साध्या कुटुंबातून शिक्षण घेत अमर यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश परिसरासाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांकडून, नातेवाईकांकडून तसेच शिक्षणसंस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे प्रेरणा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages