श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे सीएची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
बार्शी (कटूसत्य वृत्त):-बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज दिनांक ०३/०३/२०२६ मंगळवार रोजी संध्याकाळी ठिक ७ -३० वाजता यश दिनेश श्रीश्रीमाळ व मोहीत महावीर मुनोत या विद्यार्थ्यांचा सीएची पदवी प्राप्त केल्या बद्दल त्यांचा सत्कार वाचनालयाचे संचालक प्रमोद भंडारी व धिरज कुंकूलोळ यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पद्ममभाई कांकरिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचनालयाचे ऑ.सेक्रेटरी आनंद पुनमिया यांच्या हस्ते करण्यात आला प्रविंणजी सुराणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा ट्रस्टी भारतभाऊ कोटेचा यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा ट्रस्टी भारतभाऊ कोटेचा ऑ सेक्रेटरी ॲड दिनेश श्रीश्रीमाळ,मणिलाल बोथरा,महावीर मुनोत, जैन श्वेतांबर मंदिरचे धनुभाई शहा हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक आनंद सुराणा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,क्लार्क विराज पतंगे सहा ग्रंथपाल सौ शितल लुकडे यांनी परिश्रम घेतले.चहापाणी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment