शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

 शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव




अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था संचलित शिवशंकर बझारने २०२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत राष्ट्रीय स्तरावर दुहेरी मानाचा सन्मान पटकावला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि कारगिल फूड सोल्युशन्स साऊथ एशिया या नामांकित कंपन्यांकडून संस्थेचा गौरव करण्यात आला.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून उत्कृष्ट भागीदारी आणि उल्लेखनीय सहकार्याबद्दल संस्थेला “कौतुक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पश्चिम विभागाच्या महाव्यवस्थापक नीरजा चौधरी यांनी HULच्या वतीने हा पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याची दखल घेतली. 
याबरोबरच कारगिल फूड सोल्युशन्स साऊथ एशियाकडूनही शिवशंकर बझारला मोठा सन्मान मिळाला. वरिष्ठ संचालक (B2C फूड सर्व्हिसेस अॅन्ड बेकरी) शैलेश खुराणा आणि संचालक (NSM B2C) कुंदन कुमार मिश्रा यांच्या हस्ते “सुपरस्टार्स” स्टार रिटेल आऊटलेट प्रमाणपत्र देण्यात आले. भारतातील टॉप १००० स्टार रिटेल आऊटलेट्समध्ये स्थान मिळवत कारगिलच्या वाढीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला.

संस्थेचे संस्थापक स्व. उदयसिंह मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या ध्येय धोरणानुसार आणि शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तिध्वज सिंह मोहिते पाटील व अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून या यशाबद्दल शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी व्यवस्थापक गोपाळराव देशमुख यांच्यासह व्हाइस चेअरमन मदन भगत, संचालक किसनराव धुमाळ, अर्जुन भगत, सिनाप्पा वाघमोडे, कैलास ताटे, अनिल उघडे, नारायण फुले, यांच्यासह सर्व संचालक, चीफ अकाउंटंट उत्तम गुरूगुळे, चिफ परचेस ऑफिसर सुरेंद्र माने यांच्यासह सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या दुहेरी सन्मानामुळे अकलूजच्या शिवशंकर बझारचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले असून, स्थानिक सहकार क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages