सिंहगडच्या मेकॅनिकल विभागात महिला दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

सिंहगडच्या मेकॅनिकल विभागात महिला दिन साजरा

 सिंहगडच्या मेकॅनिकल विभागात महिला दिन साजरा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ‘जागतिक महिला दिन’ निमित्त विविध उपक्रमांसह कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 


मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग आणि ‘मेसा’ (MESA) कमिटीच्या लेडीज रिप्रेझेंटेटिव्हज (LR) तृप्ती विजय पाटील व सिद्धी शिवाजी कुरुंद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वनिता सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नावले होते. तसेच उपप्राचार्य तथा मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. आर. टी. व्यवहारे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.



कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या डॉ. वनिता सावंत यांनी ‘स्त्री सक्षमीकरण’ या विषयावर उपस्थित ५० हून अधिक विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आधुनिक काळात महिलांचे नेतृत्व, त्यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भूमिका आणि योगदान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून स्पष्ट केले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी तृप्ती पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सिद्धी कुरुंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. शंकर नावले यांनी मनोगतातून विद्यार्थिनींना शिक्षणासोबत आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती पाटील व सिद्धी कुरुंद यांनी केले, तर आभार प्रदर्शन वसुधा भोसले यांनी मानले.
मेकॅनिकल विभागातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages