मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह सुरू करण्याची मागणी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित चालू करण्याची मागणी राज्यातील सहकारी साखर कारखान्याकडून होत आहे.
माजी मुख्यमंत्री राज्याचे स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृहात राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या साखर कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साठी अतिथी गृह सुरू केले होते, अनेक वर्ष या गेस्ट हाऊसच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांची मोठी सोय मुंबईमध्ये होत होती.
अलीकडच्या काळात तोट्यात चाललेले गेस्ट हाऊस एका खाजगी ठेकेदाराला साखर संघाने चालवायला दिले होते, पण त्याने देखील चालवता-चालवता, सध्या अनेक महिने झाले बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे मुंबईत कारखान्याच्या कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायाने साखर संघाचे देखील अतिथी गृह बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. यामुळे साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. साखर संघाने बघ्याची भूमिका न घेता, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित सुरू करावे व राज्यातील साखर उद्योगातील अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय टाळावी अन्यथा राज्यातील सहकारी साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी यांच्या युनियन कडून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत राज्याचे सहकार मंत्री, सचिव, आयुक्त, संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.

No comments:
Post a Comment