विशेष कार्यकारी अधिकारी यांचा समता परिवाराच्यावतीने सन्मान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील समता परिवाराचे सर्वेसर्वा अँड. बी. वाय. राऊत यांनी नातेपुते शहरामधून विशेष कार्यकारी अधिकारी पदी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल गणेश पागे,मंगेश दीक्षित, नंदकिशोर धालपे, अमित चांगण, महादेव वाघमोडे, विशाल काळे, रावसाहेब पांढरे, महादेव बरडकर या सर्वांचा सन्मान समता परिवाराच्यावतीने फेटा हार घालून करण्यात आला. यावेळी भाजपा जेष्ठ नेते हनुमंत धालपे, किशोर पलंगे, अंबादास बरडकर, भाजपा नातेपुते शहराध्यक्ष राजेंद्र पांढरे, युवा नेते सुधीर काळे व इतर नागरिक उपस्थित होते. विशेष कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्र शासनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्ती केलेले पद असून प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून हे सदस्य काम करतात कागदपत्रे पाहून सत्य प्रत साक्षांकित व ओळख परेड चे काम करणे प्रशास कामात मदत करणे अशी जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकारी पदाची राहते वरील सर्व नूतन विशेष कार्यकारी अधिकारी सदस्य यांना समता परिवाराच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढील कार्यास व त्यांच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या.
.jpg)
No comments:
Post a Comment