४५० हून अधिक शेतकऱ्यांना वनशेतीचे धडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

४५० हून अधिक शेतकऱ्यांना वनशेतीचे धडे

४५० हून अधिक शेतकऱ्यांना वनशेतीचे धडे

सामाजिक वनीकरण विभाग आणि NTPC चा पुढाकार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर व राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (NTPC), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फटातेवाडी येथील NTPC प्रकल्प परिसरात भव्य 'वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळावा' उत्साहात पार पडला. या मेळाव्यास जिल्ह्यातील सुमारे ४५० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रदर्शनाचे उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वनशेतीविषयक प्रदर्शन स्टॉल्सच्या उद्घाटनाने झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन NTPC सोलापूरचे ED-HoP जगदीशचंद्र शास्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर NTPC चे CGM एम. के. बेबी, HoHR कन्हैया दास, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे आणि सहायक वनसंरक्षक श्रीमती शुभांगी जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: वनशेतीतून समृद्धीचा मार्ग
मेळाव्याच्या प्रास्ताविकात लक्ष्मण आवारे यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले:
कृषी वानिकी: ICAR माळेगाव (बारामती) येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण यांनी कृषी वानिकीतील फायदेशीर नमुन्यांविषयी तांत्रिक माहिती दिली.
रेशीम उद्योग: जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांनी रेशीम उद्योगातील शासकीय योजना आणि आर्थिक फायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
टिश्यू कल्चर: सिमा बायोटेकचे विकास पाटील यांनी साग व बांबूच्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड आणि उत्पादकता यावर प्रकाश टाकला.
मधुमक्षिका पालन: युगंधर फाउंडेशनच्या श्रीमती रेश्मा माने यांनी मधमाशी पालनाचे महत्त्व आणि विक्री व्यवस्थापनाची माहिती दिली.
बांबू हस्तकला: सचिन सोनवले (पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था) यांनी बांबूपासून वस्तू निर्मिती आणि त्यातील रोजगाराच्या संधींविषयी माहिती दिली.
चंदन लागवड: वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ कांबळे यांनी चंदन व रक्तचंदन लागवडीचे कायदेशीर पैलू आणि बाजारपेठेची उपलब्धता स्पष्ट केली.
शेतकऱ्यांना फळझाडे व प्रमाणपत्र वाटप
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी NTPC आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनपाल शिला बडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धर्मेंद्र राऊत यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages