शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी उध्वस्त करून घरादारावर नांगर फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग - आ.रोहित पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 13, 2026

शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी उध्वस्त करून घरादारावर नांगर फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग - आ.रोहित पवार

 शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी उध्वस्त करून घरादारावर नांगर फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग - आ.रोहित पवार


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने कङाङुन विरोध करण्यासाठी निमगाव (म) येथे आमदार रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर होते.
            पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,शक्तीपीठ महामार्ग  स्थानिक लोकप्रतिनिधींना व शेतकऱ्यांकडून विचारात न घेता शेतकऱ्यांवर सरकारने लादलेला महामार्ग असुन माळशिरस तालुक्यातील सुपीक व हामखास उपन्न देणाऱ्या बागायती भागातून जात असल्याने  शेतकऱ्यांनी बंधावरची व रस्त्यावरील लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे.या शक्तीपीठ महामार्गासाठी २०२३ साली ५७००० हजार कोटी रूपये खर्च होत होता.२०२६ ला १ लाख कोटी रूपये खर्च होतात एका किलोमीटर सहा पदरी महामार्ग साठी १२० कोटी खर्च होतात हाच पैसे सरकारने सिंचनावर व शेतकऱ्यांच्या अंतर्गत रस्त्यावर खर्च करावेत असे आवाहन पवार यांनी केले 
            या कार्यक्रमासाठी कृषी भुषण राजेंद्र पवार,माळशिरस पंचायत समिचीचे सभापती दत्ता मगर,माजी सभापती मच्छिंद्र ठवरे,अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने- पाटील,शक्तीपीठ संघर्ष समितीचे कोल्हापूरचे फोंङे माजी जि.प. सदस्य सतीशराव माने-देशमुख स्वाभामानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर व माळशिरस तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी निमगाव परिसरातील सर्व पक्षीय नेते मंङळी  बहुसंख्य शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
             हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मगर,ङाॅ.सचिन मगर, ॲड.जयसिंह मगर,मिनिनाथ मगर, महावीर मगर,बापु मगर यांनी परिश्रम घेतले.
*चौकट*
निमगावकरांचे मगर कुटुंबीयांचे जवाई आ.रोहित पवार असुन आमदार जावयाने सासरवाङील लोकांची काळजी घेऊन पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages