व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकीमध्ये विझोटेक २०२६ राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकीमध्ये विझोटेक २०२६ राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

 व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकीमध्ये विझोटेक २०२६ राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे आयोजन





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संशोधन हे अभियांत्रिकी शिक्षणाचे केंद्रबिंदू मानले जात असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व्ही.व्ही.पी.
 अभियांत्रिकी महाविद्यालय व व्ही.व्ही. पी. तंत्रनिकेतन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ विझोटेक २०२६’ या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अमोल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळणार असून नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणार आहे. दि. २८ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत विविध उपक्रमांसह संशोधन निबंध सादरीकरणाचाही समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन क्षमतेला नवी दिशा मिळेल, असा प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व प्राचार्य डॉ. सुनीलदत्त कुलकर्णी यांनी या स्पर्धेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असून विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्नेहल मांजरे, प्रा. अनिल अवदूत यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी परिश्रम घेत आहेत.
      या पत्रकार परिषदेस प्रा. स्नेहल मांजरे, प्रा. अनिल अवदूत, प्रा. आर. वाय. बिराजदार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages