अक्कलकोटच्या श्रीराम मंदीरात श्रीराम नवमी उत्सव संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

अक्कलकोटच्या श्रीराम मंदीरात श्रीराम नवमी उत्सव संपन्न

 अक्कलकोटच्या श्रीराम मंदीरात श्रीराम नवमी उत्सव संपन्न




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री राम जन्मले गं बाई.... श्री राम...! श्रीक्षेत्र अयोध्या  निवासी श्री राम की जय...!  च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवारी श्रीं राम नवमी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक कार्यक्रमासह सण, वार, उत्सव, सोहळा साजरा करण्यात येतो, गुरुवारी श्रीं राम नवमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान न्यासाच्या विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाने महाप्रसाद गृहात श्री राम नवमी निमित्त पाळणा कार्यक्रम गुरुवारी दुपारी १२ वा. संपन्न झाला. या प्रसंगी सुवर्णा घाडगे, रूपा पवार, तृप्ती बाबर, निशा बाबर, कविता भोसले, कविता वाकडे, छाया पवार, वैभवी पवार, अनिता गडदे यांच्या व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. पाळणा गीताबरोबरच पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, मनोज निकम, निखील पाटील, अतिश पवार, गोटू माने, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, संभाजीराव पवार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, रोहित मोरे, मैनुद्दीन कोरबू,  तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages