ओबीसी हक्क परिषदच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रकाश कटारे यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 2, 2026

ओबीसी हक्क परिषदच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रकाश कटारे यांची नियुक्ती

 ओबीसी हक्क परिषदच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रकाश कटारे यांची नियुक्ती





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ओबीसी हक्क परिषदच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रकाश निलकंठ कटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय मुख्य सल्लागार तथा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हादभाई दामोधर मोदी तसेच संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाऊ बाबुराव फाले आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक काशिनाथ गणपत पोतदार यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली आहे.

प्रकाश कटारे हे सोलापूर शहरातील गोकुळ नगर, जुळे सोलापूर येथील रहिवासी असून सामाजिक व संघटनात्मक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर शहरात ओबीसी हक्क परिषदेला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, कटारे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात ओबीसी समाजाच्या हक्क व प्रश्नांवर संघटित लढा उभारला जाईल. तसेच विचारशील व संघर्षशील कार्यकर्त्यांना संघटनेत सहभागी करून संस्थेची तत्त्वे, धोरणे आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश संघटक काशिनाथ गणपत पोतदार यांनीही या नियुक्तीबाबत शुभेच्छा देत, संघटन विस्तार आणि जनजागृतीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन केले आहे.

सोलापूर शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात या नियुक्तीची चर्चा सुरू असून, आगामी काळात ओबीसी हक्क परिषदेकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages