घरकुलाच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना मिळाला १८७१ ब्रास मोफत वाळू- कुलदीप जंगम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 2, 2026

घरकुलाच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना मिळाला १८७१ ब्रास मोफत वाळू- कुलदीप जंगम

 घरकुलाच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना मिळाला १८७१ ब्रास मोफत वाळू- कुलदीप जंगम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हयातील ६५३ लाभार्थ्यांना आतापर्यंत १८७१ ब्रास वाळू मोफत देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावातील लाभार्थ्यांचा एक गट तयार करण्यात येत असून या गटास एकाच दिवशी ऑनलाईन प्रणालीने पास वितरीत करुन त्यांना वाळू देण्यात येत आहे.

यासाठी ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांचे योगदान घेण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना सुलभपणे वाळू उपलब्ध होईल असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मध्यतंरी अतिवृष्टीमुळे यात अडथळा निर्माण झाला. अजूनही काही वाळू घाटात पाणी असल्याने वाळू उपसा करणे अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीतही प - शासनाकडून ज्या ठिकाणी वाळू उपलब्ध होईल, त्याठिकाणाहून प्राधान्याने घरकुल

लाभार्थ्यांना वाळू देण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी मंगळवार व शुकूवार असे दोन वार निश्चित करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या नोंदीनुसार महसूल खात्याकडून लाभार्थ्यांची वाळूची नोंदणी महाअॅपवर करण्यात येत आहे. महसूल खात्याकडूनही यासाठी विशेष योगदान लाभत

आहे.

अतिवृष्टीमुळे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात आतापर्यंत अडथळा होता, मात्र आता अनेक ठिकाणी वाळू उपसा करणे शक्य असल्याने लाभार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना सुलभपणे वाळू उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती सीईओ जंगम यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages