वाळूज प्रशालेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्त्रीरोगतज्ञ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

वाळूज प्रशालेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्त्रीरोगतज्ञ

 वाळूज प्रशालेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्त्रीरोगतज्ञ

डॉ. संदेश कादे यांची मुलाखत 




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील वाळूज प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रशालेचे अध्यक्ष जनार्दन बापू कादे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
     
    यावेळी प्रमुख पाहुण्यानी दीपप्रज्जलन करून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती कै.सुशांत पप्पा कादे यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ. संदेश कादे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयकुमार राजगुरू यांनी केले.

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संदेश कादे यांची मुलाखतवैष्णवी विकास पाटील, दुर्गा ब्रहदेव कादे, श्रावणी अमोल मोटे व शिवम इंद्रसेन मोटे या विद्यार्थ्यांनी घेतली. या मुलाखतीत डॉ. कादे यांनी आपल्या बालपणापासून ते डॉक्टर पर्यंतचा प्रवास कसा झाला. व आपल्या देशातील व परदेशातील आरोग्य व्यवस्था, पेशंट व डॉक्टर यांच्यातील संभाषण किती महत्वाचे असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यावेळी दिली.

तसेच मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी यांच्यावतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून या शिबिरात वाळूज परिसरातील गरजू लोकांना तपासणी करून चष्मा देण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, परिसरातील असंख्य ग्रामस्थ, माता-भगिनी उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे आयोजन  युवा उद्योजक श्री साई होंडा बार्शीचे मालक युवराज कादे यांनी केली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्याससाठी प्रशालेचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, राजेंद्र जाधव सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,व वाळूजच्या युवक वर्गांनी मोलाचे परिश्रम घेतले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुराज कुलकर्णी यांनी केले तर शिवानंद बोधले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages