सामाजिक सलोखा राखत थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम यांच्या वतीने रोजा इफ्तार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

सामाजिक सलोखा राखत थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम यांच्या वतीने रोजा इफ्तार

 सामाजिक सलोखा राखत थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम यांच्या वतीने रोजा इफ्तार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेता अमोल शिंदे व माजी सभापती मनपा शिक्षण मंडळ संकेत पिसे यांच्यावतीने पवित्र रमजान महिना निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे, सन २००७ साला पासून तत्कालीन पोलीस आयुक्त  स्व. अशोक कामठे साहेब यांच्या उपस्थितीत थोरला मंगळवेढा तालीम हे महाराष्ट्रातले पहिले गणेशोत्सव मंडळ त्यामध्ये रोजा इफ्तार पार्टीचे कार्यक्रम घेण्यात आले होते, व आज सन २०२६ रोजी ही रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन हे निरंतर आहे, सोलापूर शहर पोलीस उपआयुक्त गौहर हसन व उपायुक्त विजय कबाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी नगरसेवक तोफिक हत्तुरे, नगरसेवक चेतन नरोटे, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, एमआयएमचे शहराध्यक्ष शौकत भाई पठाण, राजू कुरेशी, राजूभाई हुंडेकरी, नगरसेवक अझरभाई हुंडेकरी, माजी नगरसेवक रियाज खरादी, करीमभाई लोखंडवाला, युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे, युवा नेते सागर पिसे, सोहेल कुरेशी, समीर शेख, प्रसाद कुमठेकर वाहिद विजापुरे, समीर लोंढे, जावेद वाडर, इब्राहिम शेख, राजू  हुंडेकरी, इम्तियाज कमिशनर, गफूर दादा शेख, अल्फरान आबादीराजे, यांच्यासह मान्यवर व रोजा सोडणारे असंख्य बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages