फारूक शाब्दीमार्फत गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

फारूक शाब्दीमार्फत गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 फारूक शाब्दीमार्फत गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक पातळीवर युद्ध सुरू असल्याने सोलापुरात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची ससेहोलपट होत आहे.अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी सोलापुरातील उद्योजक फारूक शाब्दी यांनी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दहा हजार किटचे वितरण होणार आहे,सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गरजू लोकांना हे साहित्य मोफत दिले जाणार असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली आहे.मुस्लिम धर्मीयांत रमजानचा महिना पवित्र महिना म्हणून ओळखला जातो.या महिन्यात गरिबांपासून श्रीमंता पर्यंत सर्व जण मोठ्या आनंदाने रमजान सण साजरा करतात.फारूक शाब्दी यांनी बोलताना सांगितले,या पवित्र महिन्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आम्ही जीवनावश्यक वस्तू पुरवणार आहोत.सध्या तरी आम्ही दहा हजार किटचे आयोजन केले आहे,गरज पडली तर आणखीन वाढवणार आणि तळागाळातील लोकांपर्यंत या किटचे वितरण करणार अशी प्रतिक्रिया हाजी फारूक शाब्दी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages