२२–२५ एप्रिलदरम्यान झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा संभाव्य - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 30, 2026

२२–२५ एप्रिलदरम्यान झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा संभाव्य

 २२–२५ एप्रिलदरम्यान झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा संभाव्य

१० एप्रिलला विषय समिती सदस्यांची निवड


सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा २२ ते २५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यापूर्वी १० किंवा १२ एप्रिल रोजी पाचही विषय समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार असल्याने जिल्हा परिषदेत हालचालींना वेग आला आहे.

नुकत्याच १८ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी विविध विषय समिती सभापतींची निवडही पार पडली. आता पुढील टप्प्यात विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियमानुसार, विषय समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर १२ दिवसांच्या आत सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे १० एप्रिलनंतरचा कालावधी लक्षात घेता २२ ते २५ एप्रिलदरम्यान पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या पहिल्या सभेत विविध विकासकामांचा आढावा, विभागनिहाय कामकाजाचा आढावा तसेच आगामी धोरणात्मक निर्णयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी ही सभा महत्त्वाची ठरणार असून, जिल्हा परिषदेच्या पुढील कामकाजाची दिशा याच बैठकीत निश्चित होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages