प्रिसिजनतर्फे कासेगावमध्ये विद्यार्थिनींना क्रीडा साहित्याचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कासेगाव येथील भोसले हायस्कूलमध्ये प्रिसिजन फाऊंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘समृद्धी ग्रामविकास अभियान’ अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी क्रीडा साहित्य वितरणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, प्रिसिजन फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, नितीन फलटणकर, वैशाली बनसोडे, सेवावर्धिनीच्या प्रकल्प व्यवस्थापक विद्यागौरी कुलकर्णी, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर, शिरीष तेरखेडकर तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगावचे सचिव चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना रेश्मा कदम यांनी केली. माधव देशपांडे यांनी आपल्या मनोगतात खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच खेळामुळे मैत्री वृद्धिंगत होते, पराभव स्वीकारण्याची क्षमता वाढते आणि जिंकण्याची जिद्द निर्माण होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना बुद्धिबळ, क्रिकेट साहित्य, कॅरम बोर्ड, व्हॉलिबॉल, टेनिस साहित्य, गोळाफेक संच, बॅडमिंटन आदी विविध क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सच्चिदानंद चौगुले यांनी आभार मानले. यावेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप माने, संस्थेचे विश्वस्त अमोल चौगुले, कोळी, क्रीडा शिक्षक जाधव, राऊत, संतोष चौगुले, मते, आस्टे, चौगुले तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment