सोलापूर झेडपीत सत्काराला कुदळ, फावडे, विळा अन् टोपली
उपाध्यक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या सत्कार वेळी नविन चित्र पाहायला मिळाले. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या सत्काराला चक्क कुदळ फावडे टोपली आल्याने संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे त्यामुळे उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये पुस्तक वह्या, पेन, कुदळ, फावडे, टोपली, विळा अशा वस्तू पाहायला मिळत आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्याचे कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी याच वस्तू देऊन इंद्रजीत पवार यांचा सत्कार केला.
भागाईवाडीचे माजी सरपंच शिवाजी घोडके पाटील यांनी ही वह्या व पेन देऊन अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचा सत्कार केला.
अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आपल्या स्वागताला हार बुके अन्याऐवजी शेतकऱ्यांना गरज असलेल्या वस्तू जसे कुदळ, फावडे, टोपली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हवे असलेले वही पेन पुस्तके आणावीत असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
.png)
No comments:
Post a Comment