प्रभाग क्र. ०८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

प्रभाग क्र. ०८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरण

 प्रभाग क्र. ०८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन निराकरण





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्र. ०८ मधील नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आज दिवसभरात प्रभागातील विविध भागात प्रत्यक्ष भेटीत  नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधत नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांनी विविध नागरी समस्या तत्काळ मार्गी लावल्या.

प्रभागात साखर पेठ परिसरात काही भागांत गढूळ पिण्याची पाण्याची समस्या उद्भवली होती त्या अनुषंगाने सदर भागात ड्रेनेज लाईन गाळ ट्रॉली डिस्टिलिंग वाहन घेऊन संबंधित कर्मचारी यांनी संपूर्ण लाईन परिसरातील ड्रेनेजमधील गाळ काढून लाईन पूर्ववत केली. येणाऱ्या पाण्यात दूषित पाणी येणार नाही याची खबरदारी घेतली. हे काम कनिष्ठ अभियंता अंजना कोणे यांच्या देखरेखेखाली त्यांच्या टीमकडून करण्यात आले.

विणकर उद्यान येथे उद्यानात माळी व कर्मचारीना झाडांना व हिरवळीसाठी पाणी मारण्यात अडचणी येत होती ती सुलभ व्हावी यासाठी उद्यानात पावन इंची पीव्हीसी लाईन घालण्यात आली प्रति ३० ते ३५ फुटांवर कॉक बसविण्यात आले जेणेकरून पाणी मारताना अडचण येणार नाही. सदर काम कनिष्ठ अभियंता इम्तियाज नदाफ यांच्या टीमकडून करण्यात आली. सदर उद्यानाच्या उजव्या बाजूकडील काम पूर्ण झाले असून डावीकडील बाजूसही सदर काम करण्यात येणार आहे.

प्रभागातील विविध धार्मिक मंदिर व तक्रार प्राप्त ठिकाणी झाडलोट साफसफाई करीत निर्जंतुक पावडर मारण्यात आले. सदर काम आरोग्य निरीक्षक पांडुरंग कंदी, हमीद हिरोळी, सोमनाथ सिद्धगणेश, आरती कुर्ले, लखन ताकभाते आदींच्या सैनिकांकडून ही स्वच्छतेची कामगिरी केली.

प्रभागातील दैनंदिन नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक अमर पुदाले, प्रविण दर्गोपाटील तसेच नगरसेविका सौ. बबिता अनंतकुमार धुम्मा व सौ. गीता गोविंद गवई यांच्या समन्वयातून पार पडत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages