अन्यथा तुमची लव जिहादला मुक संमती आहे - डॉ. धवलसिंह
पुढे बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, माळशिरस तालुक्यात पहिल्यांदा हा प्रकार पाहायला मिळाला. मुलगी मुलीचे कुटुंब धाडसाने पुढे आले, त्यांची फसवणूक झाली होती म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून गेलो होतो. लव जिहाद सारखी मानसिकतेला आम्ही ठेचून काढण्याचं काम यापुढे करणार आहे. हे प्रेम नाही, जाणीवपूर्वक, हेतू पुरस्कृत केलेले कृत्य आहे असे म्हणत, पुढे डॉ. मोहिते पाटील म्हणाले शेख या मुलाचे खोटे आधार कार्ड, खोटे पॅन कार्ड ज्याने बनवले, त्या टोळीचा शोध घेतला पाहिजे, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण पुढे भविष्यात शासकीय कागदांची छेडछाड करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही पाहिजे. माझं मुस्लिम समाजाच्या लोकांना आवाहन आहे, अशी फसवणूक करणारे युवक त्याच्या विरोधात मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, जर तुमचा लव जिहादला पाठिंबा नसेल तर?अन्यथा तुमची मूकसंमती आहे असा समज हिंदू मुलांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हा समज होऊ द्यायचा नसेल तर मुस्लिम समाजाने लव जिहादला विरोध केला पाहिजे, भविष्यामध्ये लव जिहादला पाठिंबा देणाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही कडक भूमिका घेऊ असेही डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.
.png)
No comments:
Post a Comment