रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण

 रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त बालाजी अमाईन्स लि यांच्या वतीने महामार्ग पोलीस मदत केंन्द्र पाकणी येथे विविध सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले.या उपक्रमांतर्गत हेल्मेट, रिफलेक्टर जॅकेट, प्रथमोचार पेटी,या साहित्याचे वितरण करण्यात आले महामार्गावर प्रवास करणा-या दुचाकी स्वारांच्या सुरेक्षेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यकमाचे आयोजन रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते या वेळी कंपनीचे जनरल मॅनेजर गोविंद मेंचेकरे यांच्या हस्ते पाकणी महामार्ग पोलिस मदत केंन्द्राचे प्रभारी अधिकारी आनंद थिटे यांना हेल्मेट रिफलेक्टर जॅकेट ,प्रथमोपचार पेटी ,यांचे कडे सुपूर्त करण्यात आले. या कार्यकमास बालाजी अमाईन्स चे सीएसआर प्रमुख अनिल विपत तसेच दत्तप्रसाद सांजेकर, आदित्य जैन, अमोल गुंड, बसवराज अंटद ,हे उपस्थित होते. बालाजी अमाईन्सच्या वतीने हेल्मेट रिफ्लेक्टर जॅकेट तसेच प्रथमोपचार पेटी या वस्तू महामार्ग पोलिस मदत केन्द्र पाकणी यांना दिल्यामुळे केन्द्रास मदत झाली या बददल आनंद थिटे यांनी यांनी बालाजी अमाईन्स लि कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages