जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सिम्बायोसिसकडून 'डी.लिट' मानद पदवी प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सिम्बायोसिसकडून 'डी.लिट' मानद पदवी प्रदान

 जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सिम्बायोसिसकडून 'डी.लिट' मानद पदवी प्रदान




पुणे (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक जीवन आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल देशाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) तर्फे प्रतिष्ठित 'डॉक्टर ऑफ लेटर्स' (डी.लिट) ही मानद पदवी प्रदान करून गौरवण्यात आले.
 विद्यापीठाच्या लवळे येथील कॅम्पसमध्ये आयोजित विशेष दीक्षांत समारंभात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
प्रख्यात शास्त्रज्ञ, फेलो ऑफ रॉयल सोसायटी (FRS) आणि 'कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च' (CSIR) चे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिंदे यांना ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक-कुलपती प्रो. डॉ.एस.बी. मुजुमदार होते.

जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध पदे भूषवली असून, त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि समाजहितासाठी केलेले कार्य आदर्शवत आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. अशा महान व्यक्तीला सन्मानित करणे हा सिम्बायोसिससाठी देखील एक मोठा बहुमान असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
या विशेष दीक्षांत समारंभाला सिम्बायोसिसच्या प्रो-चांसलर डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू (व्हाईस चांसलर) डॉ. रामकृष्णन रमण यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे आणि शैक्षणिक परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
समाजासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्याची सिम्बायोसिसची परंपरा या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून सुशीलकुमार शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages