राज प्रोएक्टिव्ह अबॅकसचे १० पैकी १० विद्यार्थी यशस्वी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राज प्रोएक्टिव्ह अबॅकस, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत शहराचा गौरव वाढवला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १० विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शंभर टक्के निकाल नोंदवला.
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
१)दिप्ती लक्ष्मीकांत बत्तुल (इयत्ता ६ वी) – क्रमांक ८,२)प्रगती विरेश कलशेट्टी (इ. ६ वी) – क्रमांक १६,३)रोनक राजेश बिंगी (इ. ६ वी) – क्रमांक १,४)ऋतिका रवि चिप्पा (इ. ३ री) – क्रमांक १३,५)श्रवंती माणिक फलमारी (इ. ५ वी) – क्रमांक १७,६)श्रेयस धिरज चौधरी (इ. ४ थी) – क्रमांक १८,७)श्रियांश श्रीकांत कटकम (ज्युनिअर केजी) – क्रमांक १८,८)स्वराज संदीप पतंगे (इ. २ री) – क्रमांक १८,९)जोहेब शकील मुलाणी (इ. ३ री) – क्रमांक १६, १०)समिक्षा अमोल शिंदे (इ. ८ वी) – क्रमांक १६.
विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर मानांकित रँक व बेस्ट परफॉर्मन्स सन्मान मिळवत केंद्राचा लौकिक उंचावला आहे. सातत्यपूर्ण सराव, योग्य प्रशिक्षण आणि पालकांचा ठाम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाले, असे केंद्राचे संचालक राजेंद्र करली यांनी सांगितले.
“राष्ट्रीय स्तरावर सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सतत सुरू राहतील.”
— राजेंद्र करली
यावेळी केंद्राच्या समन्वयक वीणा करली यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की,
“विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून योग्य दिशेने सातत्यपूर्ण मार्गदर्शन केल्यास ते राष्ट्रीय स्तरावरही उज्ज्वल यश मिळवू शकतात. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल.”
या भव्य यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment