दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात
करमाळा(कटूसत्य वृत्त):- दत्तकला शिक्षण संस्था संचलित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये 'ट्रेंडस् इन मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग स्ट्रीम्स' या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात झाली. परिषदेस भारतासह फिलिपाईन्स, इंडोनेशिया व तैवान येथील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ, संशोधन विद्वान तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. परिषद संयोजक डॉ. एस. एस.
संचालक प्रा. श्रीकांत साळुंके, डॉ. शरद कर्णे, प्राचार्य डॉ. संभाजी पाटील, प्रा. राजेंद्र वाबळे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
राजेंद्र गंगार्डे यांनी मार्गदर्शन करताना संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक प्रगतीचे महत्त्व अधोरेखित
बेरे यांनी प्रास्ताविकात परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट करताना संशोधन, नावीन्य आणि व्यवस्थापन व अभियांत्रिकी क्षेत्रातील समन्वय यांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी संचालक प्रा. श्रीकांत साळुंके यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांचे महत्त्व सांगत संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढीसाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिवा माया झोळ तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर संशोधन व नवोपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. रामदास झोळ यांनी शिक्षण, संशोधन व नावीन्य यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या संस्थेच्या ध्येयावर प्रकाश टाकला.
डॉ. कॅथलीन एबोरा पॅड्रिगालन यांनी पवनचक्की देखभालीसाठी उभ्या पृष्ठभागावर चढणाऱ्या रोबोटच्या प्रोटोटाइपवर सादरीकरण केले. डॉ. द्वी सुदान पुत्रा यांनी आधुनिक मोटर प्रणाली व स्मार्ट तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. मायसेल ए. कॅपिलायन यांनी जैवसंकेत विश्लेषण व मानवी आरोग्य या विषयावर सखोल माहिती दिली, तर डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी यांनी 'नेट झिरो एनर्जी बिल्डिंग' संकल्पनेवर मार्गदर्शन केले. दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment