अवैध मुरूम उत्खननामुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला; चिंचोलीकाटी एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाईची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

अवैध मुरूम उत्खननामुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला; चिंचोलीकाटी एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाईची मागणी

 अवैध मुरूम उत्खननामुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला; चिंचोलीकाटी एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाईची मागणी



पोखरापूर (कटूसत्य वृत्त): मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी एमआयडीसी परिसरात काही कंपन्यांकडून अवैधरित्या मुरूम उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार राजाभाऊ खरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

आमदार खरे यांनी हा मुद्दा विधानसभेत ठळकपणे मांडताना सांगितले की, चिंचोलीकाटी परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू असून, त्यावर कोणतीही रॉयल्टी शासनाकडे जमा करण्यात आलेली नाही. काही कंपन्यांनी तब्बल तीस-तीस फूट खोल असे तीन तलाव खोदून त्यातील मुरूम स्वतःच्या कामासाठी वापरल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

“अवैधरित्या काढलेल्या मुरूमावर शासनाचा महसूल न भरता मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केले गेले आहे. संबंधितांकडून रॉयल्टी वसूल केली जाणार का? तसेच या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार का?” असा थेट सवाल आमदार खरे यांनी सरकारला केला.

या प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून दोन दिवसांत चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली असून, शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages