चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट - सोलापूर च्या पर्यटनाला नवी चालना देणारे - धीरज जवळकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट - सोलापूर च्या पर्यटनाला नवी चालना देणारे - धीरज जवळकर

 चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट - सोलापूर च्या पर्यटनाला नवी चालना देणारे - धीरज जवळकर


 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह हे आपल्या सेवेत गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. ग्राहकांच्या समाधानाला आणि सेवेला प्राधान्य देत आम्ही उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. यापुढेही सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 

हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्हच्या यशस्वीतेनंतर खास सोलापूरकरांसाठी एक  भेट जे उत्तर सोलापूर येथील अकोलेकाटी, कोंडी - अकोलेकाटी रोड येथे चित्रज सिटी साईड रिसॉर्टच्या माध्यमातून जवळकर परिवार देत आहेत.
तसेच सोलापूर जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना देणे, पर्यटकांना दर्जेदार सेवा प्रदान करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे संचालक धीरज जवळकर यांनी सांगितले. 
* नैसर्गिक सौंदर्य, शांत, सुरक्षित आणि अल्हाददायक वातावरण चा अनुभव सोलापूरकरांना देण्यासाठी चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट ची निर्मिती करीत असल्याचे हॉटेल चित्रा चे संचालक  धीरज जवळकर यांनी सांगितले.
 चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट हे अत्यंत निसर्गमय वातावरण असून सोलापूर शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोलेकाटी, कोंडी - अकोलेकाटी रोड येथे उभे आहे. याचे उद्घाटन 7 मार्च रोजी सायंकाळी 07.00 वा. मातोश्री श्रीमती रंजना रमेश जवळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याचे संचालक धीरज जवळकर यांनी सांगितले.
सोलापूरच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू, प्रशस्त आधुनिक रिसॉर्ट असून या मध्ये 80 रूम्स, सात हजार स्क्वेअर फुटचे बँक्वेट हॉल, 40 हजार स्क्वेअर फुट चे सर्वात मोठे लॉन, सोबत 12 हजार स्क्वेअर फुट चे छोटे लॉन, तसेच वॉटर पार्क, एडवेंचर पार्क, व्ही.आर. गेम्स, आर्केड गेम्स, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, रेन डान्स असे बरेच काही अत्याधुनिक सुविधा या रिसॉर्ट मध्ये उपलब्ध आहेत.
पुढे बोलताना धीरज जवळकर म्हणाले की लोकांना दर्जेदार सुविधा आणि सेवा हवी आहे, म्हणून आम्ही सिटीसाईड रिसॉर्ट मध्ये प्री - वेडिंग शूट, एंगेजमेंट, डेस्टिनेशन वेडिंग, कार्पोरेट प्रोग्रॅम्स, फॅमिली ट्रिप्स सह लग्न समारंभासाठी जवळजवळ 3000 लोकांची व्यवस्था असलेले मोठे लॉन उपलब्ध करून दिलेला आहे.
अशा या अनोख्या आणि अत्याधुनिक सुविधेने नटलेल्या अकोलेकाटी, कोंडी - अकोलेकाटी रोड येथे उभ्या असलेल्या चित्राज् सिटी साईट रिसॉर्टला एक वेळ अवश्य भेट  द्यावे असे आवाहन संचालक धीरज रमेश जवळकर, चित्रा धीरज जवळकर, कुणाल धीरज जवळकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages