माढा क्रीडा संकुलातील इमारत व इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

माढा क्रीडा संकुलातील इमारत व इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन

माढा क्रीडा संकुलातील इमारत व इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन


 माढा (कटूसत्य वृत्त): माढा येथील क्रीडा संकुलात नव्या इमारतीसह इनडोअर स्टेडियमच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला अखेर गती मिळाल्याने शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

माढा शहरातील क्रीडा संकुलाचे काम दीर्घकाळ प्रलंबित होते. संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून आराखडा मंजूर करण्यात आला असून, जवळपास ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुढील टप्प्यात आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “माढा तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. या संकुलामुळे स्थानिक खेळाडूंना मोठा लाभ होईल आणि माढा शहर क्रीडा परंपरेची नवी उंची गाठेल.”

क्रीडा संकुलात इनडोअर खेळांसाठी सुसज्ज हॉल, रनिंग ट्रॅक, क्रीडांगण, स्वच्छतागृह, अभ्यासिका, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र जिम, प्रशस्त हॉल, चेंजिंग रूम आदी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा मीनलताई साठे, तहसीलदार संजय भोसले, तालुका क्रीडा अधिकारी नदीम शेख, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, राजाभाऊ चवरे, आनंद कानडे, बालाजी पाटील, नितीन कापसे, डॉ. संतोष दळवी, निलेश पाटील, सुरेश पाटील, दिनेश जगदाळे, आकाश पाटील, आबासाहेब साठे, ऋषीकाका तांबिले, संजय तांबिले, भैय्या खरात, जितू जमदाडे, अक्षय शिंदे, स्वाभिमान कदम, अभिजित उबाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages