ग्राहक म्हणून नेहमी जागरुक रहा
- तहसीलदार सचिन लंगुटे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. अनेकदा वस्तू खरेदी करताना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच गैरफायदा विक्रेते घेतात. त्यामुळे ग्राहकाने नेहमी जागरूक राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले.
तहसील कार्यालय पंढरपूर येथे 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, पुरवठा निरीक्षक विजय बादल, पुरवठा सहा. उमेश हिंगमिरे, नेताजी ओव्हाळ, ग्राहक पंचायतीचे सह सचिव आझाद आल्लापूरकर, मंडळ अधिकारी, नागरिक तसेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्री. लंगुटे म्हणाले, दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा होणारा जागतिक ग्राहक हक्क दिन हा दिवस ग्राहकांच्या अधिकारांविषयी जागृती वाढविण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. ग्राहकांना सुरक्षित दर्जेदार आणि पारदर्शक सेवा मिळाव्यात तसेच त्यांच्या तक्रारींना न्याय मिळावा यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. ग्राहकांना बाजारपेठेत खरेदी करताना अनेकदा चुकीची माहिती निकृष्ट दर्जाचे उत्पादने किंवा फसवणुकीला सामोरे जावे लागते. यासाठी ग्राहकांनी कोणतीही वस्तू घेताना पक्की पावती घेणे आवश्यक आहे. घेतलेल्या वस्तूमध्ये काही कारणास्तव खराबी किंवा त्याच्या सेवेमध्ये त्रुटी आल्यास त्या पावतीचा महत्त्वाचा उपयोग आपल्याला ग्राहक तक्रारीमध्ये करता येतो. आपण घेतलेल्या वस्तूंमध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहक कायद्याअंतर्गत आपण जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत यासारख्या विविध संघटनांची मदत घेऊन आपण या तक्रारींची निरसरण करू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्राहक पंचायतीचे सह सचिव अल्लापुरकर यांनी ग्राहक कायदा विषयक माहिती सांगून ग्राहक न्यायालयांमध्ये कशाप्रकारे तक्रारी मांडू शकतो आणि सार्वजनिक तक्रारी असतील तर त्या सीसीपीए या ग्राहक समितीकडे आपण कशा पद्धतीने मांडू शकतो याच्याबद्दल मार्गदर्शन केले. तालुक्यातील नागरिकांना काही अडचणी आल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर तालुका यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक विजय बादल यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा सहाय्यक उमेश हिंगमिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पुरवठा सहाय्यक नेताजी ओव्हाळ यांनी केले .

No comments:
Post a Comment