मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापूरकरिता निधीची घोषणा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापूरकरिता निधीची घोषणा

 मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापूरकरिता निधीची घोषणा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आमदार देवेंद्र कोठे यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी निधीची घोषणा बुधवारी विधानसभेत केली.
सोलापुरात होणाऱ्या आयटी पार्क करता जागा चिन्हांकित करण्यात आली आहे. आयटी पार्क करिता जी अर्थसंकल्पीत तरतूद आवश्यक असेल ती याचवर्षी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या आयटी पार्कसह विविध विषयांची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूरच्या विमानतळावर नाईट लाँडिंग करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. राज्य सरकारने विमानतळांवर व्यवस्था करण्याकरिता ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगची सोय करण्यात येईल. त्याचबरोबर सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचाही उल्लेख करत सोलापूरच्या उड्डाणपूलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात झालेल्या विविध निधीच्या तरतुदींमध्ये सोलापूरचा उल्लेख नसल्याबद्दल सांगत सोलापूरला निधी देण्याची मागणी केली होती. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या निधीबाबत केलेल्या तरतुदीची माहिती दिली. आमदार देवेंद्र कोठे यांचा विशेष उल्लेख करत सोलापूरकडे आपले विशेष लक्ष आहे हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages