उत्तर सोलापूरचे सभापतिपद शहाजी पवार गटाकडे; तर उपसभापतिपद यशवंत माने गटाकडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

उत्तर सोलापूरचे सभापतिपद शहाजी पवार गटाकडे; तर उपसभापतिपद यशवंत माने गटाकडे

 उत्तर सोलापूरचे सभापतिपद शहाजी पवार गटाकडे; तर उपसभापतिपद यशवंत माने गटाकडे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे मार्डी गणातून निवडून आलेल्या तेजस्विनी अमोल बोराडे यांची, तर उपसभापतिपदी नान्नज गणातून निवडून आलेले भाजपचे कट्टर कार्यकर्ते सुनील भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बोराडे या भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार समर्थक असून भोसले हे माजी आमदार यशवंत माने गटाचे आहेत, त्यामुळे तालुक्यातील सर्वांत प्रबळ असलेला माजी आमदार दिलीप माने गट पंचायत समितीच्या सत्तेबाहेर राहिला आहे.

उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्या प्रवर्गाच्या तेजस्विनी बोराडे ह्या मार्डी गणातून निवडून आलेल्या एकमेव सदस्या होत्या, त्यामुळे सभापतिपदी बोराडे यांची निवड निश्चित होती. मात्र, उपसभातिपदाबाबत प्रचंड उत्सुकता होती.

पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. भाजपकडे बहुमत होते. सभापतिपदाची मार्डी गणाची जागा ही प्रांतिक सदस्य शहाजी पवार गटाकडे जागा वाटपात गेली होती. तेथून तेजस्विनी बोराडे निवडून आल्या आहेत.

नान्नज आणि बीबी दारफळ हे दोन्ही गण माजी आमदार यशवंत माने गटाकडे होते. वडाळा, कोंडी, तिऱ्हे हे तीन गट माजी आमदार दिलीप माने गटाकडे होते. मात्र, वडाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली शिलवंत, कोंडीतून शिवसेनेचे धनाजी भोसले तर तिऱ्हे गणातून ऋतुजा बंडगर निवडून आल्या आहेत, त्यामुळे माजी आमदार दिलीप माने गटाकडे एकच जागा होती.

उपसभापतिपदासाठी नान्नजचे सुनील भोसले, बी बी दारफळच्या सुनीता बारसकर आणि पाथरीच्या ऋतुजा बंडगर यांची नावे चर्चेत होती. मात्र, यशवंत माने यांनी भोसले यांच्या नावाला पसंती दिली, त्यामुळे बारसकर यांचे नाव मागे पडले. सभापतिपदी बोराडे, तर उपसभातिपदी भोसले यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे माजी आमदार दिलीप माने गट सत्तेबाहेर राहिला आहे.

अडीच वर्षांनंतर दिलीप माने गटाला संधी?

सभापतिपदाचे आरक्षण चक्राकर पद्धतीनुसार अडीच वर्षांनंतर बदलणार आहे, त्यामुळे अडीच वर्षांनंतर ओबीसीसाठी सभापतिपद राखीव राहू शकते, त्या जागेवर माजी आमदार दिलीप माने गटाच्या ऋतुजा बंडगर यांना संधी मिळू शकते, त्याही वेळी उपसभापती कोण होणार, याची उत्सुकता असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages