सोलापूर महानगरपालिका महिला महोत्सव २०२६ उत्साह पूर्ण वातावरणात समारोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगर पालिका, महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाल बाजारपेठ मिळावी, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दिनांक ९ ते ११ मार्च २०२६ रोजी महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन सोलापूर महानगरपालिका आवार , इंद्र भवन परिसर, पार्क चौक, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते, त्याचा लाभ सोलापूर शहरातील नागरिकांनी घेतला.
सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या सहकार्याने महिलांनी उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे, अशा बचत गटांनी केलेल्या हातानी बनवलेले व आरोग्यदायी ताजे, स्वच्छ व चविष्ट खाद्य पदार्थ, विणकाम, लाकडी कोरीव काम, कापडी शिवणकाम केलेल्या वस्तु, सुगंधी वस्तु अगरबत्ती, विविध प्रकारचे मसाले, चटणी व पापड, ड्रेस मटेरियल ,साडी , कडक भाकरी,शेंगा चटणी,,शेंगा पोळी, जवस, कारळ, शेंगा, शेंगा पोळी, धपाटे , सर्व प्रकारचे पापड विक्री,मसाले , तिखट मसाले,खाद्यपदार्थ,हर्बल तेल, झाडू,खराटा,मूर्ती विक्री, कॉस्मेटिक, वडा पाव,पाणी पुरी, चायनीज पदार्थ, फ्रुट धपाटे कॉकटेल पेय, मसाले उन्हाळी काम , बिस्कीट,अगरबत्ती,धूप,ज्यूस, गुळ पावडर पुरण प्रीमिक्स नाचणी ज्वारी बिस्कीट हेल्थ ड्रिंक पावडर, यासह अनेक वस्तु चे 42 स्टाल प्रदर्शनात लावण्यात आले होते, या तीन दिवसात प्रदर्शनात सात लाखापेक्षा जास्त रूपयांची साहित्य, वस्तु ची विक्री झाली.
सोलापूर शहरातील महिलांना आपले कलागुण सादर करता यावे या करिता विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन हि करण्यात आलेले होत़े. यामध्ये १६ वर्षापुढील सर्व मुली व महिला करिता स्पर्धा हि खुली ठेवण्यात आली होती या स्पर्धेत महिला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता या वेळी विविध स्पर्धाची प्राथमिक फेरी घेऊन मुख्य स्पर्धा घेण्यात आली होती या अंतर्गत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धे साठी ३ दिवस वेगवेगळे परीक्षक उपस्थित होते यामध्ये सैफन इनामदार ,नेहा राचर्ला , स्नेहल जोशी – कुलकर्णी, आलिया इम्रान, भूमिषा शहा, आसावरी गांधी , निखील भालेराव ,रुपाली गायकवाड आदींनी केले. कार्यक्रम करिता भेट वस्तू प्रायोजक चाटला चादर सेंटर सौ. मासाई गोवर्धन चाटला व वेशभूषा स्पर्धेचे नियोजन करिता हीना बुटिक चे सैफन इनामदार यांचे सहकार्य लाभले.
महापौर विनायक कोंड्याल,आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या मार्गदर्शनानुसार ३ दिवस पार पडलेल्या महिला महोत्सव अंतर्गत सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण हे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, गट नेत्या वहीदा बनो शेख, भाजप शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, तसेच पुढील नवनिर्वाचित नगरसेविका सोनाली गायकवाड, कु.मृण्मयी गवळी, वंदनाताई गायकवाड, सुधा अल्लीमोर, साधना संगवे,सारिका खजूरगी, श्वेता खरात, श्रद्धा पवार व उपस्थित मान्यवर नगरसेविकांच्या शुभहस्ते देण्यात आले ..
चौकट
या वेळी विश्वविजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु.गंगा कदम यांना महानगरपालिकेच्या वतीने मा. उपमहापौर यांच्या हस्ते सन्मानपत्र व 50,000 रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त मनिषा मगर यांनी केले

No comments:
Post a Comment