सिंहगडमध्ये बाल विवाह विरोधी सामूहिक शपथ घेऊन महिला दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 14, 2026

सिंहगडमध्ये बाल विवाह विरोधी सामूहिक शपथ घेऊन महिला दिन साजरा

 सिंहगडमध्ये बाल विवाह विरोधी सामूहिक शपथ घेऊन महिला दिन साजरा






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात केगाव येथे सिंहगड–हिरकणी सेलच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “महिला सशक्तीकरण आणि सुरक्षा जनजागृती” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळेस बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी सामूहिक बालविवाह विरोधी शपथ घेण्यात आली. 

कार्यक्रमासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग  संचलित सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक सुवर्णा शिवानंद गाडेकर, केस वर्कर शुभांगी दत्ता कांबळे तसेच सुरक्षा रक्षक सोनाली ताटे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. हा कार्यक्रम कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळेस बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान यावर समुपदेशन झाले‌.‌ या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. मयुरी लटके यांनी काम पाहिले. 


यावेळी प्रमुख अतिथींनी महिलांचे सक्षमीकरण, सुरक्षितता, कायदेशीर हक्क आणि संकटसमयी उपलब्ध असणाऱ्या शासकीय मदत यंत्रणांबाबत विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शिक्षण, करिअर आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळेस प्राचार्य डॉ शंकर नवले, प्रा. सुवर्णा क्षीरसागर उपस्थित होत्या. 


कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षितता व स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.


✓ हेल्पलाइन चा केला प्रसार

राज्य शासनाच्या सखी वन स्टॉप सेंटरच्यावतीने वूमन हेल्पलाइन 181 तर बाल अत्याचार विरोधी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 यांचा प्रचार, प्रसार केला. यात गोपनीयता राखली जात असल्याचे सांगितले. कोणतीही अडचण आल्यास जवळच्या सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.‌

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages