जकराया मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, वटवटे यांना ISO मानांकन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सहकारी वित्त संस्थेला नुकतेच ISO मानांकन प्राप्त झाले असून ही संस्था व परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, पारदर्शक कारभार, ग्राहकाभिमुख सेवा आणि आधुनिक बँकिंग प्रणालीचा प्रभावी अवलंब यामुळे संस्थेला हे मानांकन मिळाले आहे.
दि. १२ जानेवारी २०१२ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेचे चेअरमन मा. सचिन बिराप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
संस्थेच्या संचालक मंडळामध्ये नागनाथ तुकाराम जाधव व भानुदास नामदेव गावडे हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सीईओ सौ. मनीषा सचिन जाधव यांच्याकडे असून जनरल मॅनेजर श्री. बाळासाहेब औदुंबर जाधव हे संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करत आहेत.
सध्या संस्थेच्या एकूण ठेवी सुमारे ३३० कोटी रुपये असून संस्थेच्या ११ शाखा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. संस्थेमध्ये ५० कर्मचारी कार्यरत असून ते ग्राहकांना विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण सेवा देत आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योगिक व व्यावसायिक घटकांना आर्थिक मदत, कर्ज सुविधा तसेच बचत योजनांद्वारे सक्षम करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. संस्थेच्या पारदर्शक व शिस्तबद्ध कामकाजामुळे ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.
संस्थेला प्राप्त झालेले ISO मानांकन हे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण सेवा, सक्षम व्यवस्थापन व उच्च दर्जाच्या कामकाजाची दखल असल्याचे मानले जात आहे. या मानांकनामुळे संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ होऊन भविष्यात संस्थेच्या प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे.
याबाबत बोलताना चेअरमन मा. सचिन बिराप्पा जाधव यांनी सांगितले की, “सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक परिश्रमामुळे संस्थेला हे यश मिळाले आहे. पुढील काळात संस्थेच्या सेवा अधिक आधुनिक, सक्षम व ग्राहकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या यशाबद्दल परिसरातील नागरिक, सभासद तसेच विविध मान्यवरांकडून संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment