सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शिवप्रसाद फाउंडेशनचे मोलाचे कार्य- शरद मोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 14, 2026

सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शिवप्रसाद फाउंडेशनचे मोलाचे कार्य- शरद मोरे

 सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शिवप्रसाद फाउंडेशनचे मोलाचे कार्य- शरद मोरे




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शेतकरी हितासाठी शिवप्रसाद उद्योग समूह कटिबद्ध आहे. शिवप्रसाद मल्टीस्टेट सहकारी दूध संघाच्या माध्यमातून सभासदांच्या दुधाला इतर संघांच्या तुलनेत प्रति लिटर ५ रुपये अधिक दर दिला जात आहे.केवळ दरच नव्हे, तर दुधाची गुणवत्ता आणि जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी 'शिवप्रसाद कॅटल फीड' मार्फत उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य पुरवले जाते. पशुपालकाचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शिवप्रसाद फाउंडेशनचे मोलाचे कार्य असल्याचे मत शिवप्रसाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद बापू मोरे यांनी आपले मत व्यक्त केले ते​ शिवप्रसाद मल्टीस्टेट दूध संघ, एस.पी.जी. इन्शुरन्स, शिवप्रसाद कॅटल फीड्स, नमो इटेबल ऑइल, श्री शरद बापू मोरे मोटार वाहतूक सहकारी संस्था व शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने गुरसाळे तालुका माळशिरस येथे घेण्यात आलेल्या जनहित जागर मेळावा प्रसंगी बोलत होते. पुढे बोलत असताना ते म्हणाले की, दुग्ध व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी आणि हा व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योग समूहाने विविध सेवांचे जाळे विणले असून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकरी सक्षम झाला तरच देश प्रगती करेल या उद्देशाने माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात आम्ही 'जनहित जागर मेळावा' आयोजित करून शेतकऱ्यांच्या दारात सेवा पोहोचवत आहोत ​ दुग्ध व्यवसायासाठी 'शिवप्रसाद अर्बन' आणि 'एस.पी.जी. मल्टीस्टेट'तर्फे सुलभ कर्जपुरवठा देखील केला जात.असल्याचे शरद मोरे यांनी सांगितले. याप्रसंगी मेळाव्याला गुरसाळे परिसरातील सेंटर चालक,शेतकरी, दूध उत्पादक आणि शिवप्रसाद समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages