दत्तात्रय सावंत यांचा वेतनासाठी पाठपुरावा; वेतन खात्यावर जमा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील माहे फेब्रुवारी पेड इन मार्च २०२६ चे वेतन काल शिक्षकांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
शासकिय कर्मचार्यांचे वेतन दरमहा १ तारखेला खात्यावर जमा करण्याबाबतचा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयके फाॅरवर्ड केल्यानंतर महिना अखेरला वाढीव घरभाड्याची थकित रक्कम अदा करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.त्यामुळे सर्व वेतन देयके रिजेक्ट करण्यात आले.नव्याने पुन्हा सर्व वेतन देयके फाॅरवर्ड करण्यात आली.काही ठराविक शाळेच्या शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या वेतनामुळे त्यात पुन्हा पेच निर्माण झाला.या सर्व प्रक्रीयेतुन मंगळवारी वेतन पथक कार्यालयामार्फत वेतन देयके ट्रेझरीला पाठविण्यात आली.गृहकर्ज,वैयक्तिक कर्ज,पतसंस्था,बॅंका व इतर हप्ते यामुळे शिक्षकांचे लक्ष वेतनाकडे होते.गुढीपाडवा व रमजान सणाच्या तोंडावर वेतनाचा प्रश्न उद्भवल्याने शिक्षक आर्थिक संकटात होते.वेतन देयके ट्रेझरीत पाठविल्यानंतर डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी माजी पुणे विभागीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्यायामार्फत वेतनासाठी वैभव राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला.ट्रेझरी आॅफीसर वैभव राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ई कुबेर प्रणालीद्वारे वेतन खात्यावर जमा केले.वेतन पथक अधिक्षक विठ्ठल ढेपे,वरिष्ठ लिपिक सोनल केत मॅडम यांचे सहकार्य लाभले.यासाठी आप्पाराव इटेकर,विनोद आगलावे,वल्लभ चौगुले व अ.गफुर अरब यांनी प्रयत्न केले.

No comments:
Post a Comment