दिनचर्या पाळणे अत्यंत गरजेचे- आ. रणजितसिंह मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकलूज येथे उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या दिमाखात पार पडली. या वेळी नियमित दिनचर्या पाळणे, आरोग्याची काळजी घेणे आणि समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या “उदय सभागृह”, शंकरनगर (अकलूज) येथे आयोजित या सभेचे उद्घाटन आमदार मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. राजू ताटेवार, डॉ. गजानन पडघम, डॉ. शैलेश निकम, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सोपान खर्चे, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. अमिता कुकडे, डॉ. प्रज्ञा खोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महत्त्वपूर्ण सभेचे यशस्वी यजमानपद निमा अकलूज शाखेने उत्कृष्ट नियोजनातून पार पाडले. राज्यभरातील डॉक्टर, पदाधिकारी आणि निमा परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी निमा अकलूज शाखेच्या वतीने “जीवनगौरव पुरस्कार सोहळा” आयोजित करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास स. म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्कार डॉ. एम. पी. मोरे, डॉ. विठ्ठल महामुनी आणि डॉ. श्रीनिवास जामदार यांना प्रदान करण्यात आला.
तसेच निमा अकलूज शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप देवकाते, डॉ. आप्पासाहेब वाघमोडे, डॉ. रमेश बिडवे, डॉ. हरिश्चंद्र सावंत, डॉ. जयंत चव्हाण, डॉ. प्रविण पाटील, डॉ. शिरीष रणनवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी “निमारत्न” पुरस्काराने डॉ. शैलजा गुजर, डॉ. कांचन कुलकर्णी, डॉ. जयश्री माने, डॉ. निशात मुल्ला, डॉ. निलांबरी मगर, डॉ. माणिक मोटे, डॉ. विलास वाघ, डॉ. दिलीप वाघमोडे, डॉ. नानासाहेब तरंगे, डॉ. उदयसिंह माने-देशमुख, डॉ. उत्तम खरात, डॉ. बाळकृष्ण नष्टे, डॉ. सुधीर पोफळे, डॉ. अस्लम शेख, डॉ. दिलीप गुजर, डॉ. रोहित देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निमा अकलूज शाखेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले यामध्ये डॉ तानाजीराव कदम, डॉ. मिलिंद गुळभिले, डॉ अंजली कदम, डॉ.अमोल माने, डॉ.प्रशांत निंबाळकर, डॉ.हर्षवर्धन गायकवाड यांचा समावेश होता.
या भव्य कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, निमा सदस्य आणि उपस्थितांचे आयोजकांच्या वतीने अकलूज निमा वुमन्स् फोरमच्या अध्यक्षा डॉ.विद्या एकतपुरे यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment