दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये आंतरराष्ट्रीय परिषद
भिगवण (कटूसत्य वृत्त):- दत्तकला शिक्षण संस्था संचलित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, स्वामी-चिंचोली येथे “Trends in Management and Engineering Streams (TIMES 2K26)” या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक १३ व १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे तसेच University of Science and Technology of Southern Philippines यांच्या सहकार्याने व संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. रामदास झोळ आणि संस्थेच्या सचिवा मा. सौ. माया झोळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. व्यवस्थापन व अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या संशोधन प्रवाहांवर चर्चा घडवून आणणे, संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधन संस्कृती विकसित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
या परिषदेसाठी देश-विदेशातील मान्यवर तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. प्रा. डी. एस. चौहान (प्रो चान्सलर GLA युनिव्हर्सिटी मथुरा उ. प्रदेश ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून डॉ. कॅथलीन एबोरा पॅड्रिगालन व डॉ. मायसेल ए. कॅपिलायन (फिलिपाईन्स), डॉ. द्वी सुदार्नो पुत्रा (इंडोनेशिया) तसेच डॉ. फिरोज इस्माईल मुलाणी (तैवान) हे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेत संशोधन निबंध सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन तसेच विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या परिषदेत सर्व विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेच्या सचिव मा. सौ. माया झोळ व संस्थापक-अध्यक्ष मा. प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment